आमच्याबद्दल

शाश्वत विकासाच्या दिशेने, गावातील प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून

2000+
नागरिक
50+
वर्षांचा इतिहास
100%
डिजिटल सेवांचे
24/7
सेवा उपलब्ध
आमच्याबद्दल

समृध्द अंथरवनप्रिंपी

अंथरवनप्रिंपी गणपुर हे बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील एक प्रगतिशील गाव आहे. बीड शहरापासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव दोन महसुली गावांचे विलीनीकरण असल्याने भौगोलिक दृष्ट्या विस्तृत आहे.

गावामध्ये हलकी आणि भारी अशा दोन्ही प्रकारची शेती होते. गावातील बहुतेक लोक दूध उत्पादनाशी संबंधित असून काही शहरांमध्ये येऊन रोजी-रोटी करणारे नागरिक आहेत. भूमिहीन लोक केवळ २-३% आहेत, त्यामुळे गावात गरीबी खूपच कमी आहे.

आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी गावातील सामाजिक परिस्थिती उत्कृष्ट आहे. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आणि विचाराने राहतात. पाणी फाउंडेशन मार्फत रेशीम उत्पादक गट कार्यरत झाला आहे आणि त्याला मनरेगा ची साथ मिळाल्याने गटातील सर्व शेतकरी यशस्वी झाले आहेत.

गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून सतत आरोग्य विषयक जनजागरण आणि उपचार होतात. दोन अंगणवाड्या आणि एक जिल्हा परिषद शाळा यांचा समन्वय साधून शिक्षणात गुणवत्ता निर्माण करण्यात यश मिळाले आहे.

'गावाच्या विकासातील महत्त्वपूर्ण यशांमध्ये:

  • दैनिक लोकमत वृत्तपत्राचा "सरपंच ऑफ द इयर 2025" पुरस्कार
  • जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळ जोडणी
  • विज, रस्ते, पाणी या मूलभूत समस्या सुटल्या
  • सर्व दलित व अल्पसंख्यांक वस्त्यांमध्ये रस्ते व पथदिवे
  • विहिरींवर सोलार पंप बसवून विजेची बचत
गावातील महिला बचत गट सक्रिय असल्याने लखपती ताईंची संख्या जास्त आहे. मनरेगा मार्फत वैयक्तिक गायगोठे, जलसिंचन विहीर, रेशीम लागवड, बांबू लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामे चालू आहेत.'

ग्रामपंचायत कार्यालय अंथरवनपिंप्री

ग्रामपंचायत कार्यालय अंथरवनपिंप्री

गावातील कार्यक्रम

गावातील कार्यक्रम

सैन्यात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सैन्यात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

पंचायतराज अभियान :  वनराई बंधारा

पंचायतराज अभियान : वनराई बंधारा

आमचे ध्येय आणि ध्येयवाद

दृष्टी

Vision

ला एक आदर्श ग्राम म्हणून विकसित करणे जिथे प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावले जाईल, शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक विकास साधला जाईल आणि गावाची परंपरा आणि संस्कृती जपली जाईल.

उद्देश

Mission

पारदर्शक आणि नागरिक केंद्रित प्रशासन राबवणे, डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या जीवनात सुलभता आणणे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणे.

आमचे मूल्ये

आमच्या कार्याचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक तत्त्वे

पारदर्शकता

सर्व निर्णय आणि कार्यवाही पारदर्शक आणि जबाबदार

नागरिक केंद्रित

नागरिकांच्या गरजा आणि हितसंबंध प्रथम

नावीन्य

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नावीन्यपूर्ण उपाय

सेवाभाव

नागरिक सेवेसाठी समर्पित आणि कटिबद्ध

आमची कामगिरी

गेल्या वर्षात आम्ही साध्य केलेले महत्त्वाचे उद्दिष्टे आणि उपलब्धी

100% डिजिटल सेवांचे

सर्व नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या

95% शिक्षण दर

गावातील मुलांची शिक्षणाची गुणवत्ता सुधारली

स्वच्छ गाव पुरस्कार

राज्यस्तरीय स्वच्छता स्पर्धेत प्रथम क्रमांक

संपर्क सेवा

अंथरवनप्रिंपी ग्रामपंचायत

ग्रामस्थांसाठी समर्पित संपर्क सेवा. आपल्या समस्या, सूचना, व विकासकामांबाबत आमच्याशी सहज संपर्क साधा. प्रत्येक ग्रामस्थाचा आवाज महत्त्वाचा आहे.

पत्ता

ग्रामपंचायत कार्यालय, अंथरवनप्रिंपी, ता.जि. बीड, महाराष्ट्र

दूरध्वनी

+91 95616 28179

ईमेल

antharvanpimpri@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार : सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00

आमचे स्थान

ग्रामपंचायत कार्यालय, अंथरवनप्रिंपी

संदेश पाठवा

आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या